Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Bookmark
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Full Site Search  
 
Fri Jan 18 10:39:52 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search

News Posts by Kapil

Page#    Showing 1 to 5 of 17 news entries  next>>
  
Jan 11 (20:49) रेल्वेच्या मेगा ब्लॉक;  १२, १९ रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द (m.lokmat.com)
Other News
CR/Central
1 Followers
3267 views

News Entry# 373722  Blog Entry# 4194189   
  Past Edits
Jan 12 2019 (07:38)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Kapil/31285

Jan 12 2019 (07:38)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Kapil/31285

Jan 12 2019 (07:38)
Station Tag: Kurduvadi Junction/KWV added by Kapil/31285

Jan 12 2019 (07:38)
Station Tag: Solapur/SUR added by Kapil/31285

Jan 12 2019 (07:38)
Train Tag: Solapur - Pune Intercity (Indrayani) SF Express/12170 added by Kapil/31285

Jan 12 2019 (07:38)
Train Tag: Pune - Solapur (Indrayani) SF Express/12169 added by Kapil/31285
Posted by: Kapil 17 news posts
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनमधील दौंड-कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन ...
अन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदलट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांकरिता ब्लॉक घेण्यात आलामागील काही दिवसांपासून दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनमधील दौंड-कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्या  असून अन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य
...
more...
रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील काही दिवसांपासून दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून कामाच्या निमित्ताने ब्लॉक घेण्यात येत आहे़ या ब्लॉकदरम्यान धावणाºया रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे़ ब्लॉकदरम्यान धावणारी गाडी क्रमांक १२१६९ व १२१७० पुणे-सोलापूर-पुणे    एक्स्प्रेस १२ व १९ जानेवारी रोजी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, भिगवण-वडशिंगे रेल्वे स्थानकादरम्यान एकेरी लाईन सेक्शनमध्ये ट्रॅकच्या कामासाठी ३ डिसेंबर २०११ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला होता़ ३० दिवसांच्या विश्रांतीनंतर १ जानेवारी रोजी रुळावर आलेल्या इंद्रायणीला दोन दिवसांच्या आत  पुन्हा एक दिवसाचा ब्रेक लागला होता़ पुन्हा सुरळीत सुरू झालेल्या इंद्रायणी गाडीला १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे़ दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने सोलापूर मार्गावर दिवसा धावणारी व सोलापूरकरांसाठी सोयीची            असलेली प्रवासी रेल्वे गाडी पुन्हा एकदा बंद केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे़ इंद्रायणी रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
या गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल
या गाड्या उशिराने धावणार
दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी सोलापूर विभागात रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येत आहे़ यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल करण्यात आला आहे़ या कामी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे व झालेल्या बदलाची नोंद घ्यावी़- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर

  
547 views
Jan 14 (07:21)
manager3se~   463 blog posts
Re# 4194189-1            Tags   Past Edits
ब्लॉक तर घेतला आहे पण मग काय काम करणार आहेत

  
459 views
Jan 14 (07:59)
manager3se~   463 blog posts
Re# 4194189-2            Tags   Past Edits
कारण अजून मध्या रेल्वे ची प्रेस नोट आली नाही
  
Dec 02 2018 (23:56) वाठार स्टेशनजवळ रेल्वे इंजिन घसरले (dhunt.in)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
1842 views

News Entry# 370652  Blog Entry# 4063448   
  Past Edits
Dec 02 2018 (23:57)
Station Tag: Wathar/WTR added by Kapil/31285

Dec 02 2018 (23:57)
Train Tag: Pune - CSMT Kolhapur Passenger/51409 added by Kapil/31285
Stations:  Wathar/WTR  
Posted by: Kapil 17 news posts
पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर वाठार रेल्वे स्टेशननजिक महाकाली मंदिर येथील रेल्वे पुलाजवळ पुणे-कोल्हापूर प्रवाशी रेल्वे गाडीचे इंजिन घसरले. इंजिन दीडशे ते दोनशे मीटर रेल्वे मार्ग सोडून फरफटत गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून कोल्हापूरकडे जाणारी प्रवाशी रेल्वे गाडी नंबर 51409 ही दुपारी तीनच्या सुमारास वाठार रेल्वे स्टेशननजीक आल्यावर रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सुमारे दोनशे मीटर इंजिन रेल्वे रूळ सोडून बाजूला झाले. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली व केवळ इंजिनच रूळ सोडून खाली आले. पाठीमागे असलेले प्रवाशी डबे रुळावरच थांबले. गाडीतून जवळपास दीड हजारांहून प्रवाशी होते.
ज्याठिकाणी
...
more...
घटना घडली आहे.त्याच्या पाठीमागे खोल दरी व पुल आहे.तेथील पुल ओलांडून गाडी पुढे आल्यावर सदरची घटना घडली आहे. पुलावर अथवा पुलाच्या आसपास जरी ही दुर्घटना घडली असती तर मोठी जीवित हानी झाली असती. गाडीचा चालक एस. के. पत्की याने याबाबत बोलताना सांगितले कि, अचानक काहीतरी झाल्याचा आवाज आला आणि मी इमर्जन्सी ब्रेक दाबले. तरी इंजिन जवळपास दोनशे मीटर रेल्वे रूळ सोडून फरफटत गेले. केवळ चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानानेच आज मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, दुर्घटना स्थळावर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. वाठार स्टेशन पोलीस व रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सातारा व कोल्हापूर येथे जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध करून दिली. साडेचारच्या सुमारास लोणंद बाजूकडून दुसरे इंजिन आणून प्रवाशी डबे लोनंद रेल्वे स्टेशन कडे नेण्यात आले. पुणे व मिरज जंक्‍शन वरून क्रेन आल्यावर इंजिन बाजूला करून वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. घटनास्थळी मंडल रेल प्रबंधक मिलिंद देवस्कर तातडीने हजर झाले. रेल्वे वाहतूक तातडीने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
  
Nov 30 2018 (18:59) रोजच्या सव्वादोन तासांच्या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेगाडी महिनाभरासाठी बंद (www.lokmat.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
2827 views

News Entry# 370448  Blog Entry# 4056692   
  Past Edits
Nov 30 2018 (18:59)
Station Tag: Bhigwan/BGVN added by Kapil/31285

Nov 30 2018 (18:59)
Train Tag: Solapur - Pune Intercity (Indrayani) SF Express/12170 added by Kapil/31285

Nov 30 2018 (18:59)
Train Tag: Pune - Solapur (Indrayani) SF Express/12169 added by Kapil/31285
Posted by: Kapil 17 news posts
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांतर्गत भिगवण-वडशिंगे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू येत्या ३ डिसेंबरपासून सुमारे ३० दिवसांसाठी दररोज सव्वादोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द
सोलापूर : रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी भिगवण-वडशिंगे रेल्वे स्टेशनदरम्यान दररोज सव्वादोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे़ त्यानिमित्त रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे़ यासाठी इंद्रायणी एक्स्प्रेससह तीन गाड्या ३ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यानच्या काळात ३० दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ याच दरम्यान अनेक प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आला असून, अन्य काही गाड्या ठराविक मार्गावरून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य
...
more...
रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांतर्गत भिगवण-वडशिंगे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या ३ डिसेंबरपासून सुमारे ३० दिवसांसाठी दररोज सव्वादोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैदराबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. 
पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ९.३० वाजता सुटून दुपारी १.३० वाजता सोलापूर येथे पोहोचत होती़ त्यानंतर सोलापूर येथून ही रेल्वे गाडी दुपारी २ वाजता सुटून पुण्यात ६.०५ वाजता पोहोचत होती़ दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला असून, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे या रेल्वे गाडीचे आरक्षणही बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
 या बंद झालेल्या गाड्यांमुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणाºया सोलापुरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात कसरत करत एसटी बस, खासगी बसने प्रवास करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे़ आरक्षण बंद झाल्याने अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणाºया हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंत केले असल्याचेही सांगण्यात येत आहे़ रेल्वे प्रशासनाने यापूर्वी वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून १२५ दिवसांसाठी दररोज १ तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता.
- गाडी क्रमांक ७१४१३ पुणे-सोलापूर (डेमू) पॅसेंजर पुणे ते सोलापूर निर्धारित वेळेनुसार धावणार आहे़ त्यानंतर गाडी क्रमांक ७१४१४ प्रमाणे सोलापूर ते कुर्डूवाडी आणि कुर्डूवाडी ते सोलापूरपर्यंत धावणार आहे़ यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक ७१४१६ ही गाडी पुण्यापर्यंत धावणार आहे़ कुर्डूवाडी ते पुणेदरम्यान आणि गाडी क्रमांक ७१४१५ पुणे ते कुर्डूवाडीदरम्यान धावणार नाही.

  
Nov 30 2018 (19:38)
Kapil   242 blog posts   139 correct pred (61% accurate)
Re# 4056692-1            Tags   Past Edits
some newspaper say the block is for maintenance work and some say its for for doubling work...
don't know what is happening, too much delay for doubling work.
  
कुर्डुवाडी : दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यास उद्दिष्टापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी रेल विकास निगमच्या अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. कागदपत्रे भिरकावत त्यांनी 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली. परेलची सर्व नॅरोगेजची कामे कुर्डुवाडी वर्कशॉपला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचे विविध 14 विभागाच्या मुंबई व सोलापूरच्या 28 अधिकार्‍यांच्या ताफ्यासह दुपारी 4 वाजता कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर आगमन झाले. गाडीतून उतरल्यानंतर ते थेट प्रवाशी विश्रामगृहात रेल विकास निगम लिमिटेडने (आर.व्ही.एन.एल) तयार केलेल्या माहिती कक्षात गेले. याठिकाणी विभाग 1 चे चिफ प्रोजेक्ट मॅनेजर ए.के. पटेल व विभाग 2 चे आनंद स्वरुप हे दुहेरीकरण कामाची माहिती देत असताना, संथ गतीच्या कामांवर सरव्यवस्थापक शर्मा भडकले. काम पूर्ण होण्याचे उद्दिष्ट 2015 असताना काम पूर्ण का झाले नाही? अशा कोणत्या अडचणी
...
more...
होत्या, आम्हाला कळविले का नाही? असा प्रश्‍नांचा भडिमार केला. 2020 पर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा मध्य रेल्वेला आर.व्ही.एन.एलची गरज नाही, असे खडे बोल सुनावत हातातील कागदपत्रे भिरकावली.
संतप्त झालेल्या शर्मा यांनी स्टेशन मॅनेजरच्या कक्षात जाऊन अधिकार्‍यांसह ठाण मांडले. याठिकाणी विविध कामगार संघटना, आर.पी.एफ., जी.आर.पी.एफ. प्रमुखांनी शर्मा यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, संत दुहेरीकरणाबाबत आर.व्ही.एन.एलच्या अधिकार्‍यांची पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेत असल्याचे सांगितले. परेलमधील डिझेल इंजिनसह सर्व नॅरोगेजचे काम कुर्डुवाडी वर्कशॉपला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दौंड-गुलबर्गा यासह कुर्डुवाडी-लातूर व कुर्डुवाडी-मिरज या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शर्मा यांच्यासोबत सोलापूर विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, कुर्डुवाडी स्टेशन मॅनेजर आर.डी. चौधरी, वाणिज्य व्यवस्थापक एस.ए. शिंदे यांच्यासह 28 प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कुर्डुवाडी स्थानकाला 10 हजार रुपयांचे बक्षीस
सरव्यवस्थापक शर्मा यांनी स्वच्छतेबाबत कुर्डुवाडी स्थानकाला 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले. लातूर ते कुर्डुवाडी मार्गावर सरव्यवस्थापकांची खास 14 डब्यांची गाडी ताशी 120 च्या उद्दिष्टाच्या वेगाने आणल्याबद्दल चालक बजरंग घाडगे, सहाय्यक एस.बी. मुळे व गार्ड एस.बी. मुळे यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले.
  
Nov 02 2018 (00:00) बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला (dhunt.in)
IR Affairs
CR/Central
0 Followers
4799 views

News Entry# 367589  Blog Entry# 3961681   
  Past Edits
Nov 02 2018 (00:01)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by Kapil/31285
Stations:  Baramati (Terminus)/BRMT  
Posted by: Kapil 17 news posts
बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
Page#    17 news entries  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy